पावसाच्या जोरदार फटक्यात शेतीचे झाले नुकसान ! आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी केली उचंदे परिसरात पाहणी!! पंचनामे करण्याचे दिले आदेश !

0
51

उचंदे ता.मुक्ताईनगर /प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.मुसळधार पावसाने मात्र केळी ,कपाशी ,ज्वारी अक्षरशः नेस्तनाबूत झाली.शेतातील झालेल्या नुकसानीची बांधावर जाऊन मुक्ताईनगरचे धडाडीचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी पाहणी केली .तहसीलदार ,कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.त्यांनी
उचंदे परिसरातील शेमळदे,मुंढळदे,मेळसांगवे,पंचाणे,पुरनाड,उचंदे गाव परिसरातील शेती नुकसानीचा आढावा घेऊन नुकसानभरपाई तातडीने मिळाली पाहिजे असे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासित केले .

आज मतदारसंघातील मेंढोळदे ता .मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली .याप्रसंगी सोबत तहसीलदार वाढे ,कृषी अधिकारी अभिनव माळी,युवा सेना जिल्हा प्रमुख पंकजभाऊ राणे,दिलीप पाटील सर, सुभाष पाटील,साहेबराव सिताराम पाटील,समाधान केशव पाटील, भागवत पाटील सर, देविदास केशव पाटील, संजय पाटील, जगन्नाथ पांडुरंग पाटील, शांताराम आत्माराम पाटील, वसंत पाटील, विनायक पाटील, गोपाळ पाटील, राजेंद्र पाटील, धोंडू पाटील , संतोष पाटील, नाना घाटे,शिवसेना शाखाप्रमुख संदीप पाटील,किसन पाटील, जगन्नाथ पाटील, लीलाधर पाटील, योगेश पाटील, देवानंद पाटील, साहेबराव ओंकार पाटील, साहेबराव किसन पाटील, बंडू पाटील,आदी उपस्थित होते.
—————————-
शेतकऱ्यांची अवस्था दयनीय!
मे महिन्यात वादळाने केळीला तर आता मुसळधार पावसाने कपाशीला फटका!
आ.चंद्रकांतभाऊ पाटील

मे जून महिन्यात याच परिसरात चक्रीवादळ आले.केळीचे मोठे नुकसान झाले होते.आता कपाशीवर आभाळ कोसळले .शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.बळीराजाचे अर्थशास्त्र कोसळले.शासन स्तरावर सर्व मदत देण्यासाठी प्रयत्न करत आहे.पीक विमा कंपन्यांनी त्वरित नुकसानभरपाई द्यावी .
—————-+————+——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here