केळी ,कपाशी ,ज्वारी ,बाजरी, सोयाबीन, मका उद्ध्वस्त! जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे!!

0
73

 

जळगाव
————————————-
!
! मनोजकुमार महाले
संपादक
! आयबीएन एकमत
!
!———————————-
जळगांव जिल्ह्यामध्ये गेल्या सात – आठ दिवसापासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे .मुसळधार पावसाने नद्या-नाले ,धरणे , फुल झाले आहे ! जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरल्याने आनंद व्यक्त केला जात असला , तरी मुसळधार पावसामुळे केळी ,कपाशी ,ज्वारी, सोयाबीन ,मका ,इतर कडधान्ये यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र पार कोलमडून गेले आहे आणि पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे! ही अतिशय चिंता निर्माण करणारे घटना म्हणावी लागेल. जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतीक्षेत्र पावसात वाहून गेल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळते आहे .अशा वेळेला जिल्हाधिकारी जळगाव यांनी कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष न करता ताबडतोब राज्य प्शासनाला अहवाल देऊन संपूर्ण जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला पाहिजे , अशी मागणी आम्ही यानिमित्ताने करत आहोत !
एकरी कपाशीला जवळपास 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. मात्र आता झालेला खर्चही भरून निघणे कठीण होऊन बसले आहे. संपूर्ण कपाशीचे क्षेत्र जळगाव जिल्ह्यामध्ये उद्ध्वस्त होऊन गेले आहे. मे – जून महिन्यामध्ये केळीवर अशीच संक्रांत कोसळली होती आणि हजारो हेक्टर मधील केळी चक्रीवादळात भुईसपाट झाली होती, त्याची मदत अद्याप मिळाली नसतानाच आता कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पदरी जोरदार पावसाने मोठे संकट उभे केले आहे .
या संकटाला पुढे कसे सामोरे जायचे हाच प्रश्न आता यानिमित्ताने पुढे उपस्थित होत आहे .
आम्ही या निमित्ताने मागणी करत आहोत की संपूर्ण जळगाव जिल्हा ओला दुष्काळ ग्रस्त जाहीर झाला पाहिजे आणि त्यानिमित्ताने मिळणारे सर्व लाभ शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर गेले तरच फायदा होईल.
पंचनामे करू ,शासनाला अहवाल देऊ हे वेळखाऊ धोरण अवलंबता कामा नये !कोणत्याही परिस्थितीत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून वैयक्तिकरित्या मदत मिळणे हीच आजच्या काळाची गरज आहे. सरकारने सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. जिल्हा प्रशासनाने तशा प्रकारचा अहवाल राज्य सरकारला तातडीने देणे गरजेचे आहे .

*रस्ते गेले वाहून…..!*

जोरदार झालेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यामधील जवळपास सर्वच रस्त्यांचे तीन-तेरा वाजले आहे .मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने रस्तेही खराब झाले आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ते दुरुस्तीचे कार्य हाती घेणे आवश्यक आहे .

*धरणे फुल्ल!पाणी टंचाई दूर!!*

या निमित्ताने एक आनंदाची घटना अशी म्हणता येईल की जोरदार पावसामुळे नद्या ,नाले, जळगाव जिल्ह्यातील धरणे सर्व तुडुंब भरले आहे .जमिनीमधील पाण्याच्या पातळीमध्येही कमालीची वाढ झाल्याने ही एक आनंदाची गोष्ट आहे असेही म्हणावे लागेल .जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जोरदार पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्यात उद्भवणारी समस्या सुद्धा यानिमित्ताने निकालात निघाली असल्याने ही सुद्धा एक चांगली घटना म्हणावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here