तुम्ही पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण…

0
443

मुंबई : तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहण्यास सांगता, असे ट्विट अभिनेत्री कविता कौशिकने केल्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केल्याने ती चर्चेत आली.

जगभरात कोरोना व्हायसने धुमाकूळ घातला असताना यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध देशांनी लॉकडाऊन केले आहे. नागरिकांचे मनोरंजन व्हावे म्हणून भारतात रामायण मालिका सुरू करण्यात आली. पण, ही मालिका सुरू झाल्यानंतर कविता कौशिकने ट्विट करून लक्ष वेधून घेतले. तिने ट्विटरवर म्हटले आहे की, ‘तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहण्यास सांगता.’ या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले. एका युजरने तिला तू मोबाइलवर काही पाहू शकतेस. रामायण तर टीव्हीवर दाखवले जात आहे.

एका नेटिझन्सने कविताला ट्रोल करताना म्हटले आहे की, ‘आम्ही तुला रामायण बघायला सांगितलेले नाही. तू इतकीही महत्त्वाची नाही. डीडी चॅनल कोणत्या नंबरवर येते, हे तरी तुला ठाऊक आहे का. बेकार ट्वीट करू नकोस. वेळेचा सद्उपयोग कर.’
दरम्यान, कविताच्या ट्विटवर नेटिझन्सनी व्यक्त होताना तिला ट्रोल केले. शिवाय, तिला अटक करण्याची मागणीही करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here