श्री.पी.टी.पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
46

जामनेर [प्रतिनिधी ]     पी.टी.पाटील, मुख्याध्यापक जि.प मराठी शाळा टाकरखेडा यांना दिनांक ३/१०/२०२१ रोजी जळगाव येथे महाराष्ट्र राज्य कुबेर समूह तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कुबेर समूहाचे प्रमुख श्री. संतोष लहामगे तसेच जळगाव जिल्हा कुबेर समूहाचे समन्वयक श्री.प्रा.बी.एन. चौधरी, श्री. निलेश भांडारकर, सौ. रेखा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.पाटील यांनी राबविलेले शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी माय, बाप हे काव्यसंग्रह स्वखर्चाने संपादित केलेले आहे. बालविश्व, किलबिल हे त्यांचे चारोळी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. तरफडा, आटोपला खेळ, काही माणसे, माझी शाळा इत्यादी कविता त्यांच्या आहेत. “माझे विद्यार्थी, माझे दैवत” हे त्यांचे ब्रीदवाक्य असून विद्यार्थी हित जोपासण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. स्वच्छतेवर त्यांचा नेहमी भर असतो. म्हातारीची शेती हे कृतीयुक्त गीत ते विद्यार्थ्यांना कृतीद्वारा करून दाखवतात. त्यांना पंचायत समिती जामनेर , जळगाव जिल्हा परिषद तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच अनेक पुरस्कार पाटील यांना मिळालेले आहेत. शांतीसुत पी.टी.पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मित्र परिवार, नातेवाईक तसेच शिक्षकांकडून, विद्यार्थ्यांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here