खादगाव येथे युवा उद्योग परिषदेत सन्मानपत्र वितरण*

0
52

*खादगाव येथे युवा उद्योग परिषदेत सन्मानपत्र वितरण*
खादगाव ता.जामनेर येथे युवा उद्योजक ग्रुप खादगाव आयोजित पहिली उद्योग परिषद नुकतीच पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंचावरील मान्यवरांचे स्वागत सृष्टी चौधरी व साक्षी चौधरी या लहान मुलींच्या हस्ते करण्यात आले.परिषदेत गावातील ५५ विविध लघु उद्योग व्यवसाय करणाऱ्या युवकांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.उद्योग व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय हा विषय अनेक प्रेरणादायी उदाहरणे देत एस.टी चौधरी सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शेती जोड धंदे व शेतीसाठी च्या विविध योजना यावर मिलिंद पाटील (कृषी सहाय्यक) यांनी माहिती देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी युवा उद्योजक ग्रुप तर्फे विविध उद्योग व्यवसायांची यादी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.यावेळी मंचावर रामदास काळबैले बाबा,भगवान ढेकाळे, प्रभाकर चौधरी यांची उपस्थिती होती.
गावातील युवा उद्योजक सन्मानपत्र तूषार आमोदकर, धनराज चौधरी, नितीन चौधरी, राजेंद्र चौधरी, गणेश भोईटे, धनराज पाटील, अमोल महाजन, गोपाल पाटील, निवृत्ती ढेकाळे, राजेंद्र पवार, विशाल चौधरी, युवराज चिंचोले, बापू चौधरी, अण्णा सूर्यवंशी, श्याम लोहार, ज्ञानेश्वर तायडे, अनिल बरकले, सुनील टेमकर, विजय भोई, भास्कर चौधरी, सोपान तायडे, गौरव चिंचोले, निलेश सोनवणे, प्रवीण सपकाळे, मोहित कोळी, किरण सूर्यवंशी, निखिल गावंडे, सुनील महाजन, शिवाजी पवार, विशाल गावंडे, रविंद्र सोनवणे, बाळू चौधरी, दिलीप शिंदे, धनराज कुंभार, संजय कोळी, प्रफुल्ल पाटील, संतोष सपकाळे, अर्जुन ढेकाळे, दगडू बरकले, प्रवीण चौधरी, गोकुळ चिंचोले, सागर चौधरी, योगेश सपकाळे, विकास न्हावी, अशोक भोई, समाधान गुरव, राजू भोई, कल्पेश जैन, सागर सोनवणे, दिनेश सपकाळे, संदीप माई, नीलेश जैन, सुनील चौधरी, संभाजी चौधरी, सागर निळे यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन मंचावर सत्कार करण्यात आला. तसेच यापुढेही विविध परिषदा उद्योग मेळावे घेऊन गावातील युवकांना उद्योग व्यवसायाकडे वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.
याप्रसंगी युवा वर्गाची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पद्माकर चौधरी, सुनील चौधरी, संजीव सपकाळ, बाळू चौधरी,श्रीराम पाटील,धनराज पाटील, गणेश भोईटे, स्वप्नील पाटील, राजू सूर्यवंशी, समाधान सपकाळे, योगेश चिंचोले, राजू सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चौधरी प्रास्ताविक संजीव सपकाळ तर आभार स्वप्नील पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here