१४ व्या वित्त आयोगाचा निधी गेला कुठे ? ———————————————————————– टाकळी खु.ग्रामस्थांचा सवाल चौकशीसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा ————–

0
48

१४ व्या वित्त आयोगाचा निधी गेला कुठे ? ———————————————————————– टाकळी खु.ग्रामस्थांचा सवाल चौकशीसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा ————————————————————————जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील टाकळी खु.ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधुन कोणतेच काम झाले नसुन या निधीच्या रक्कमेचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असुन.याची.चौकशी करण्यात यावी अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. मौजे टाकळी खु.ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाच्या मार्फत किती निधी आला व तो निधी कसा खर्च केला.१४ व्या वित्त आयोगाच्या आलेल्या निधीतुन गावात कोणतेच कामे झालेले नसुन आजपर्यंत ग्रामसुध्दा घेण्यात आलेली नाही. स्मशानभुमीचे काम अपुर्ण अवस्थेत असुन त्या कामाची पुर्ण रक्कम काढण्यात आली आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सन २०१९-२० मध्ये शेताजवळील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम केलेले दाखवुन शासनाची व गावाची फसवणूक सरपंच व ग्रामसेवक यांनी संगमताने रक्कमेचा अपहार केला आहे.सदर काम फक्त कागदावरच दाखवले आहे.या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा आम्ही ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना निवेदनातुन देण्यात आला आहे. विजय चवरे,जितेंद्र माळी,अमोल महाजन,प्रकाश महाजन,संभाजी बावस्कर, धनराज माळी, मनोज नेरकर, राजेंद्र महाजन, किशोर माळी यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here