शेतकऱ्यांच्या सन्मानात … महाविकास आघाडी मैदानात…..! प्रहार जनशक्ती पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना,राष्ट्रीय काँग्रेसचे कार्येकर्ते उतरले रस्त्यावर ….,लखीमपुर शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ जामनेरात सकाळपासुन कडकडीत बंद….!!

0
58

शेतकऱ्यांच्या सन्मानात … महाविकास आघाडी मैदानात…..!
प्रहार जनशक्ती पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना,राष्ट्रीय काँग्रेसचे कार्येकर्ते उतरले रस्त्यावर ….,लखीमपुर शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ जामनेरात सकाळपासुन कडकडीत बंद….!!

जामनेर /विशेष प्रतिनिधी
महा विकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जामनेर शहरातून आज जोरदार प्रतिसाद मिळाला !शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुकारलेला हा बंद यशस्वी झाल्याची माहिती महा विकास आघाडी तर्फे देण्यात आली! काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ,प्रहार संघटनेने यात पुढाकार घेतला होता !
लखिमपुर उत्तर प्रदेश शेतकऱ्यांची क्रूर हत्या झाल्याच्या निषेधार्थ सोमवार १२ ऑक्टोबर रोजी राज्याच्या  महविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी विरोधी ३ काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मोदी  सरकारने शेतकऱ्यांच्या हत्या करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे लखिमपुर  येथील संतापजनक घटनेवरून समोर आले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याचा बचाव करण्याचे पुरेपूर प्रयत्न योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील   उत्तरप्रदेश सरकारने पोलीस बळाचा वापर करून आंदोलन कर्ते शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. दोषींना कठोरत कठोर कारवाई व्हावी यासाठीसर्वच पक्षांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
जामनेर शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच कडकडीत बंद ठेवला होता .बहुतेक दुकानदारांनी स्वयंप्रेरणेने आणि स्वयंशिस्तीतून आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. काही दुकाने बंद होती ,त्यावेळेला महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली असता ताबडतोब दुकाने बंद करण्यात आली .
जामनेर शहरात बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला .अत्यावश्यक सेवा वगळता जवळपास सर्वच दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद होती. शासकीय कार्यालये , बँका , मेडिकल , दूध विक्री केंद्रे मात्र सुरू होते .
जामनेर शहरांमध्ये आजचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला. कोणत्याही प्रकारे शांततेला हानी पोहोचली नाही आणि किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेने पार पाडण्यात आला .
दुपारनंतर व्यापाऱ्यांनी हळूहळू लोकाग्रहास्तव आपली दुकाने सुरु करण्यास प्रारंभ केला .जामनेर मोठ्या बाजारपेठांमध्ये आणि व्यापारी कॉम्प्लेक्समध्ये सर्व चे सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्यामुळे महाविकास आघाडीने व्यापाऱ्यांचे आभार मानले.यावेळी महाविकास आघाडीचे प्रदिप गायके,मनोजकुमार महाले ,सौ.वंदना चौधरी,संजयदादा गरुड,डिगंबरदादा पाटील,अँड.ज्ञानेश्वर बोरसे, विलास राजपूत, किशोर पाटील ,माधव चव्हाण, पप्पू पाटील, विश्वजितराजे मनोहर पाटील, निळकंठ पाटील,विशाल लामखेडे , अतुल सोनवणे, शरद ञ्यंबक पाटील, शंकर राजपुत, ज्ञानेश्वर पाटील,गणेश झाल्टे, मुलचंद नाईक ,दिपक राजपुत ,मुसा पिजारी, विजय पाटील, रऊप शेख नासिम शेख, संदिप पाटील , बंटी पाटील, पंकज पाटील ,संजय राठोड, सुनिल घुगे,र्कुबान शाहा, प्रमोद पाटील , गणेश पांढरे, मुकेश जाधव, अशोक जाधव,महेंद्र बिऱ्हाडे, सुधाकर सराफ,कार्तिक काळे,रिजवान मनियार, विनोद सोनवणे, सुरेश चव्हाण, कैलास माळी, दिपक माळी, ॲड.भरत पवार,अरूण सावकारे, उस्मान शेख,तुकाराम गोपाळ,सईद शेख,फैजान शेख,आनस खान, इम्रान खान इम्रान गफ्फार, अनिस पैलवान, विनोद माळी ,डॉ. प्रशांत पाटील ,प्रभू झाल्टे ,मोहन चौधरी, उत्तम पाटील, हिम्मत राजपूत ,राजीव नाईक, समीर सय्यद , डॉ.बाजीराव पाटील संदीप हिवाळे, सुमीत राजपुत ,भगवान पाटील ,अर्जुन पाटील ,दत्ता नेरकर गजानन पाटील, पुंडलिक पाटील ,व्ही.पी. पाटील सर ,विशाल पाटील ,दीपक रेशवाल ,प्रल्हाद बोरसे, अरविंद चितोडिया या राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस ,शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधि-यासह शेकडो कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here