“शरीरातील गर्मी चुटकीत बाहेर येईल, शितपित्त दिवसात गायब, अंगाला खाज, तोंड येणे, घाम येणे बंद”

0
139

फक्त अर्धा ग्लास दिवसभरामध्ये कधीही प्या, शरीरातील उष्णता पूर्णपणे निघून जाईल. शरीर पूर्णपणे थंड पडेल. उष्णतेमुळे होणारे त्वचा विकार नाहीसे होतील. सतत उष्णतेमुळे अनेकदा तोंड येणे, अंगाला खाज सुटणे अश्या अनेक समस्या उद्भवत असतात. अशावेळी हा पदार्थ शरीराला थंडावा देतो. हा पदार्थ शरीराला थंडावा देतो. अंगावर गाठी उठणे असतील, लाल गुलाबी किंवा त्वचेच्या रंगाचे चट्टे येत असतील तर त्या जागेवर प्रचंड प्रमाणामध्ये खाज सुटत असेल अशा वेळी हा पदार्थ अत्यंत परिणामकारक असा हा उपाय ठरतो.पावसाळा संपला की हिवाळा ऋतू सुरू होतो अनेकदा एकाएकी वातावरणामध्ये बदल घडून अनेकदा शरीरात उष्णता वाढायला लागते. अनेकदा नैसर्गिकपणे पित्तदोष वाढत जातो यासोबतच डोळे दुखणे, अंगाला खाज सुटणे, अंगाला घाम येणे अशा तक्रारी होत असतात. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय अत्यंत महत्वाची भूमिका बनवतो.हा जो उपाय आहे तो आपल्या शरीराला थंडावा देतो. उष्णतेमुळे होणारे विकार आहेत ते सुद्धा या पदार्थामुळे नाहीसे होतात. हा उपाय कसा करायचा त्याबद्दल ची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.चंदनाच्या लाकडाचा म्हणजेच चंदनाचे जे लाकूड आहे ते आयुर्वेदिक दुकानांमध्ये तुम्हाला सहजपणे उपलब्ध होते. या चंदनाच्या तुकड्यांमध्ये अँटी सेप्टिक गुण असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चंदनाचा जो गर असतो त्यामुळे आपल्या शरीरात वाढत जाणारी उष्णता आहे ती कमी करायला मदत होते तसेच अनेकदा आपल्याला पित्तामुळे वेगवेगळे दोष निर्माण होत असतात ते सुद्धा चंदनामुळे नाहीसे होतात. पित्त दोष संतुलित राहतो. अल्सर असेल, तोंड आले असेल, अंगाला खाज सुटत असेल किंवा पित्ताच्या गाठी उठत असतील अशा या समस्यावर चंदन अत्यंत उपयुक्त ठरतो.हा उपाय करण्यासाठी आपल्याला चंदनाचा तुकडा थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आहे त्यानंतर सहानी वर किंवा दगडावर तुकडा उगाळून घ्यायचा आहे. त्याचा लेप काढून घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी चंदन लेप आपल्याला लागणार आहे. एका वाटीमध्ये हा लेप काढून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खडी साखर. खडीसाखर शरीरातील उष्णता कमी तसेच अनेक उष्णतेचे विकार दूर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. खडीसाखरेची वाटलेली बारीक पावडर आपल्याला लेपामध्ये ऍड करायचे आहे.तुम्हाला गरजेनुसार तुम्ही ही पावडर ऍड करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका ग्लासमध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे चंदनाचा लेप टाकून त्यात खडीसाखर पावडर टाकून हे मिश्रण प्यायचे आहे. हे मिश्रण दिवसभरातून कधीही प्यायले तरी आपलायला फायदेशीर लाभ होणार आहे. हा उपाय तीन ते चार दिवस करू शकता. अगदी लहान मुले असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील तर सर्वांनी दिवसभरामध्ये कधी ही मिश्रण प्यायले तरी शरीरातील वाढत जाणारी उष्णता व या उष्णतेमुळे होणारे विकार खाज, खरूज ,त्वचा विकार असेल अशा सगळ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त ठरतो. शितपित्त असेल तर अशा वेळी हा चंदनाचा लेप लावला तर त्वरित आराम मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here