गिरीश महाजनांना पैशांची मस्ती ; आमदार रोहित पवार

0
95
जळगाव । ता. मुक्ताईनगर :- कोणतीही निवडणूक आली की फोडाफोडीचे राजकारण गिरीश महाजन अगोदर करत असतात. पैशांच्‍या ताकदीचे घमंड असल्‍यानेच ते करत आहेत. त्‍याचा वापर मतदान काळात केला जात असल्‍याने एकप्रकारे लोकशाहीला तळा जातो. परंतु, लढत ही लोकशाहीच्‍या माध्‍यमातून झाली तर खरी ताकद जनतेसमोर येईल; असा निशाणा राष्‍ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्‍यावर साधला. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

भाजप नेत्‍यांनीच केली खडसेंची ताकद कमी
खडसे परिवारामागे असलेल्‍या ईडीच्‍या चौकशीबाबत बोलताना रोहित पवार म्‍हणाले, की एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. भाजपमध्‍ये असताना तेव्‍हाच त्‍यांची ताकद कमी करण्याचे काम भाजपमधील काही नेत्‍यांनी केले. शिवाय जळगाव जिल्‍हा परिसरात देखील भाजप नेते त्‍यांची ताकद वाढविण्यासाठी बहुजन समाजाच्‍या मोठ्याची ताकद कमी करण्याचे काम करत आहे. त्‍याचा भाग म्‍हणजे ईडीची चौकशी आहे.
ईडी नव्‍हे तर भाजपचेच नेते बोलतात
ईडीकडून आघाडीच्‍या नेत्‍यांची चौकशी सुरू आहे. यावर बोलताना पवार, म्‍हणाले ईडीची चौकशी महाराष्‍ट्रातच नाही, तर बाहेरच्‍या राज्‍यात देखील कारवाई सुरू आहे. हे लोकशाहीला सोडून असून सुडाचे राजकारण केले जात असल्‍याची टीका देखील पवार यांनी केली. तसेच चौकशीवर ईडी काहीच बोलत नसून भाजपचे काही नेते समोर येवून चौकशीबाबत ईडीचा पुरावे दिल्‍याचे बोलत आहेत.
संतांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपली
राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आज मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दसऱ्याच्‍या दिवशी भगवा ध्‍वज उभारण्यात आला. हा ध्‍वज ज्‍या धार्मिक पिढांवर जावून आला; तेथे प्रेरणा घेण्यासाठी जात असून संत मुक्‍ताईचे दर्शन हा त्‍याचाच भाग असल्‍याचे रोहित पवार यांन सांगितले. तसेच समाजातील सर्व घटकांना सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे संतांचे विचार राहिले आहेत. आपण ही याच विचाराने जायला पाहिजे हा विचार घेऊन पुढे जाण्याची सर्वांची जबाबदारी असायला हवी, कोरोना काळात आपण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी वारीला जाणे टाळून संतांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे त्याग केला आहे. त्याबद्दल त्यांनी उपस्थित वारकऱ्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here