शेंदूर्णी नगरपंचायत च्या माध्यमातून शहरात निर्जंतुकिकरन औषद फवारणी
राज्यात दिवसंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून आता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नागरपंचत, ग्रामपंचायत देखील कंबर कसून कमला लागली असल्याचे दिसत आहे.प्रत्येक महानगर पालिका,नगर पंचायत ग्रामपंचायत, ग्रामीण आरोग्य केंद्र, हे आपल्या स्तरावर कोरोनवर प्रतिबंध करता यावा म्हणून निर्जंतुकीकरण,फवारणी करत आहे.याच पार्शभूमीवर शेंदूर्णी नगर पंचायत च्या माध्यमातून शहरा मध्ये औषद फवारणी करण्यात येत असून लोकांनी या संदर्भात खबरदारी घ्यावी या साठी सतत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल निकम, व नगर पंचायतीचे शासकीय अधिकारी साजिद पिंजारी यांच्या मद्यमातून मार्ग दर्शन व उपयोजना करण्यात येत आहे. सद्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जागतिक आकडेवारी पाहून गंभीर होणे काळाची गरज आहे.अन्यथा अनर्थ आपल्या नियंत्रणापालिकडे जाईल व आपणास कोणीही मदत करू शकणार नाही. कायदा सर्वच बाबींची दाखल घेऊ शकत नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आव्हान मुख्य अधिकारी साजिद पिंजारी यांनी केले या वेळी शेंदूर्णी नगरपंचायत चे उपनगर अद्यक्ष पती गोविंद अग्रवाल,नगर सेवक निलेश थोरात, पप्पू गायकवाड,शरद बारी,श्रीकृष्णा चौधरी,श्याम गुजर व अन्य नगर सेवक कार्यकर्ते उपस्थित होते.