प्रहार जनशक्ती पक्ष व साधनाई फाऊंडेशन तर्फे नोकर भरती मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

0
88

प्रहार जनशक्ती पक्ष व साधनाई फाऊंडेशन तर्फे नोकर भरती मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

भडगाव ;- [ प्रतिनिधी] भडगाव येथे दिनांक 18/11/2021 रोजी डी. एड. कॉलेज च्या प्रांगणात प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव व साधनाई फाऊंडेशन भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पी.आर. एम.सिकुरिटी सर्व्हिस पूणा यांच्या अंतर्गत नोकर भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता.मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब प्रताप हरी पाटील हे होते तर उद्घाटन पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील यांच्या हस्थे करण्यात आले. सदरच्या मेळाव्यास बाहेरील जिल्ह्यातील औरंगाबाद,बुलढाणा,अकोला नासिक,नगर,नंदुरबार ,धुळे,यांच्या सह जळगाव जिल्ह्यातील असंख्य युवकांनी रात्री पासूनच हजेरी लावली होती.ह्या मेळाव्यास सुमारे पाच ते सहा हजार युवक हजर होते.मेळाव्याच्या भरती साठी होणारी नोंदणी सकाळी सात वाजेपासून सुरू होती.मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद व गर्दी होऊन असंख्य युवक आले होते. त्यांची भरती प्रक्रिया व लेखी परिक्षा रात्री आठ वाजेपर्यंत सुरूराहीली.मेळाव्यातून पात्र युवकांची निवड करून त्यांची लेखी परीक्षा घेवून त्यातून गुणवत्ता यादी नुसार सुमारे पाचशे युवक हे भरती होणार आहेत.सदरहू मेळावा घेण्या मागचा उद्देश म्हणजे
कोरोणा सारख्या महाभयंकर संकटाने असंख्य सुशिक्षित तरुणांना बेरोजगार करून आर्थिक दृष्ट्या घेरले होते.ते बेरोजगार तर आहेतच पण त्याहून जास्त तीव्र झळ आर्थिक दृष्ट्या ग्रामीण भागातील तरुणांना बसत असल्याने बेरोजगारी वाढली आहे.तसेच जळगाव जिल्हा हा जास्तीत जास्त शेतीवर अवलंबून असलेला व इतर आर्थिक स्रोत नसलेला जिल्हा आहे.त्यातच जिल्ह्यात
पूरग्रस्त संकट,त्यात अतिवृष्टी आणि शेतीचे अतोनात झालेले नुकसान,ह्या सर्व बाबींचा विचार करून शेतकरी वा इतर तरुण बांधवांनी खचून न जाता त्यांना उभे करून संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा नोकर भरती मेळावा आयोजित केल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजयकुमार रायभान भोसले यांनी सांगितले.या होणाऱ्या मेळाव्यासाठी फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि प्रहारचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील,सरचिटणीस देवा भाऊ महाजन,प्रहार विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते अक्षय चांदगुडे
निरज खैरनार
शुभम भोसले
गोलू राजपूत
जयोदीप अहिराराव
उमेश कोळी
तेजस देवरे
भूपेंद्र पाटील
पवन पाटील
ल्स्वप्निल सोनवने
राकेश पाटील
भूषण चौधरी
स्वप्निल बेडिसकर
अमोल पाटील
विजय महाजन
संजय कोळी
दुर्गेश गाडगे
सौरभ भोसले
मयूर पतील
तुषार महाजन
दादू पाटील
सौरभ देशमुख
अनस शेख यांनी आतोनात परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here