जैन इरिगेशनतर्फे 1 लाख घरांपर्यंत कोरोना माहिती पुस्तिकेचे वितरण सुरु

0
314

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन निर्देशित माहिती पुस्तिकेचे वितरण जळगाव शहरात काल दि. 30 मार्च पासून सुरु झाले. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन ने सदर मार्गदर्शक माहिती पुस्तिका जळगाव शहरासाठी एक लाख पुस्तिका छापून दिलेल्या असून या पुस्तिका प्रत्येक घरोघरी व्यक्तीगत पातळीवर पोहोचविण्यात येत आहे.

कोविड-2019 (नवीन करोना विषाणू आजार – nCov) ही माहिती पुस्तिका छापतांना व वितरण करतांना सॅनिटायझरचा उपयोग करुन जंतूनाशकांची फवारणी करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेमध्ये करोना विषाणू-सर्वसाधारण माहिती, करोना विषाणू-आजाराची लक्षणे, हा आजार पसरतो कसा?, आजार होवू नये यासाठी घ्यावयाची काळजी, वैद्यकीय सल्ला ताबडतोब कोणी घेतला पाहिजे?, नवीन करोना विषाणू उपाय योजना, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, सर्वसामान्य मनात उद्भवणारी प्रश्न आणि त्याचे निरसन, काय करावे व काय करु नये?, राष्ट्रीय – राज्यस्तरीय व स्थानिक संपर्कासंदर्भातील संपूर्ण माहिती या पुस्तिकेत दिली असून ही सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाची पुस्तिका जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन यांनी छापून दिली आहे. या आजारासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सिव्हिल) 0257-2226642 (132) कोरोना कक्ष यावर संपर्क साधावा.

या माहिती पुस्तिकेचे व्यक्तीगत स्तरावर कालपासून शहरात वितरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत शहरातील विविध परिसरात घरो-घरी 36000 पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. उर्वरित पुस्तके पुढील काही दिवसांमध्ये वितरित करण्यात येणार असून वितरण करतांना प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर, टोपी, हॅण्डग्लोव्हज (हातमोजे), सॅनिटायझरचा उपयोग व पुस्तक वितरण करतांना किमान एक मिटरचा अंतर राखून वितरण करण्यात येत आहे. या संदर्भात या सेवाभावी सर्व मुला-मुलींना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

याकामी जिल्हाप्रशासनातर्फे मा. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, मा. पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, मा. मनपा आयुक्त सतिष कुळकर्णी, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. चे चेअरमन अशोक जैन व मनपा मुख्य लेखा परिक्षक संतोष वाहुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. माहिती पुस्तिकेच्या वितरण व्यवस्थेसाठी शहरातील विविध सेवाभावी संस्था व व्यक्तींचे योगदान लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here