तेरा पिढ्यांपासून परंपरा

0
394

अहीर सुवर्णकार समाजाचे कुलगुरू रामदास अहिरराव यांच्या बारा पिढ्या वंशावळी लिहीत होत्या. आता ते स्वत: देखील कुलगुरू म्हणून सोनार समाजातील वंशावळी लिहीत आहेत. त्यांचा मुलगा देखील आता परंपरागत काम करीत असल्याने गेल्या 13 पिढ्यांपासून ते वंशावळी लिहून त्याची माहिती साठवून ठेवत आहे.

ताडपत्रावर वंशावळीचे जतन
गेल्या तेराशे वर्षांपूर्वी कागद नसल्याने त्यावेळी ताडपत्रावर वंशावळी लिहिली जात होती. त्यानंतर ताम्रपत्र, नंतर बांबूच्या झाडापासून तयार करण्यात आलेल्या “लाटीव’चा वापर केला. यानंतर खलिताचा वापर देखील वंशावळी लिहिण्यासाठी करीत होते. यानंतर आता कागदावर लिहिण्यास सुरवात केली आहे. रामदास अहिरराव यांच्याकडे गेली 1300 वर्षे जुनी ताडपत्रावर लिहिलेली वंशवाळी आजही त्यांनी जपून ठेवली आहे. या ताडपत्रावर पूर्वीच्या काळी एका पानावर चार पिढ्यांची वंशावळी शॉर्ट लिपिमध्ये लिहिली आहे.

आजही देवनागरीचा वापर
अहिरराव यांच्याकडे देशभरातील समाजबांधव आपली वंशावळी बघण्यासाठी येत असतात. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती देखील केली आहे. तसेच त्यांच्याकडे आतापर्यंत 72 हजार समाज बांधवांची वंशावळीमध्ये माहिती आहे. पूर्वी देवनागरी लिपीत लिहिलेली वंशावळी आता कागदावर उतरवीत असून, त्यामध्ये देखील देवनागरी व मराठीचा वापर केला जात असल्याची माहिती रामदास अहिरराव यांनी दिली.

वंशावळीवर “लॉकडाउन’चा परिणाम नाही
सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनच्या काळात देखील सुवर्णकार समाजाचे कुलगुरू रामदास अहिरराव हे बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे ते समाजबांधवांची माहिती दूरध्वनीवरून घेत वंशावळी लिहिण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे “लॉकडाउन’चा परिणाम त्यांच्या परंपरागत कार्यावर झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here