तीन महिन्यांचे विज बिल माफ करा : आ. किशोर जोरगेवार यांची मागणी

0
178

मुंबई : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.सलग तीन महिने टाळेबंदी लागू करण्यात आल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. अशात कुटुंबाचा उदरर्निवाह करण्याचे मोठे आवाहन नागरिकांपूढे आहे.यातच भर म्हणून महावितरणच्या वतीने तीन महिन्यांचे विद्यूत बिल नागरिकांच्या घरी पाठविले आहे. सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात असतांनाच आलेले हे विज बिल भरायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला असून सध्याची त्याची आर्थिक स्थिती पाहता लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे विज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

संपुर्ण देश कोरोनाशी लढत आहे तर महाराष्ट्रात तर कोरोनाचा अधिक उद्रेक जाणवत आहे. याचा परिणाम राज्यातील इतर जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यावरही झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. संध्या टाळेबंदी शिथील करण्यात आली असली तरी मागील तीन महिने संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन राहल्याने नागरिकांचा रोजगार गेला आहे. चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा असल्याने कामगारांची संख्या येथे अधिक आहे. मात्र लॉकडाऊन काळात औद्योगीक क्षेत्रासह बांधकाम क्षेत्रही बंद राहील्याने कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे. त्याच बरोबर आँटो, ट्रँक्सी चालक, छोटे व्यापारी, यांचे व्यवसायही लॉकडाऊन काळात चांगलाच प्रभावीत झाला आहे.

अशात आता विद्यूत विभागाच्या वतीने नागरिकांना टाळेबंदीच्या काळातील तीन महिन्यांचे एकत्रित एँवरेज बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पहिलेच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांपुढे विज बिलाचे नवे संकट उभे झाले आहे. त्यामुळे विज विभागातील नागरिकांमध्ये रोष आहे. आजच्या घडीला चंद्रपूरातील संचारबदी शिथील असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामाला सुरुवात झाली आहे. मात्र लॉकडाऊन काळातील तिन महिण्यांची आर्थिक पोकळी भरुन काढण्यासाठी वेळ लागणार आहे. अशात नागरिकांकडून तीन महिन्यांचे एकत्रित बिल वसूलने अन्यायकारक असून लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here