अन्‌ सोळा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह ;लग्नाला उपस्थिती भोवली

0
365

एका गावातील तरुणाचा विवाह नुकताच पार पडला. मात्र, विवाह प्रसंगी कोणत्याही शासकीय आदेशाचे पालन करण्यात आले नाही. विवाहास उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. तसेच ठरावीक अंतर न लावता सर्व जण जवळ जवळ उभे राहिले होते.

एरंडोल : शासकीय आदेशांचे पालन न करता त्याकडे दुर्लक्ष करून विवाह करणे एका परिवारास चांगलेच महागात पडले आहे. नवविवाहित दाम्पत्यासह विवाहास उपस्थित असलेले सोळा नातेवाईक व फोटोग्राफर देखील पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विवाह, सार्वजनिक कार्यक्रम, मृत्यू सारखे दुख:द प्रसंग या ठिकाणी गर्दी न करता शासकीय आदेशांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
एका गावातील तरुणाचा विवाह नुकताच पार पडला. मात्र, विवाह प्रसंगी कोणत्याही शासकीय आदेशाचे पालन करण्यात आले नाही. विवाहास उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावले नव्हते. तसेच ठरावीक अंतर न लावता सर्व जण जवळ जवळ उभे राहिले होते. सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या विवाहास उपस्थित असलेल्या नातेवाइकांनी शासकीय आदेशाकडे दुर्लक्ष केले. याचे परिणाम संपुर्ण परिवाराला भागावे लागले.

अन्‌ सोळा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
विवाहास उपस्थित असलेल्या तब्बल सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नवविवाहित दाम्पत्यासह हळद लावणारे, विवाहाचे फोटो काढणारे छायाचित्रकार व दोन्ही बाजूकडील नातेवाइकांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत नवविवाहित दाम्पत्य कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, अन्य नातेवाईक देखील उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले आहेत. विवाहानंतर नवदांपत्यास कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागले आहे. दरम्यान विवाहास उपस्थित असलेल्या नातेवाइकांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हणूनच करा आदेशाचे पालन
प्रशासनातर्फे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती जमा करण्यात येत असून त्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. विवाह, सार्वजनिक कार्यक्रम, मृत्यू सारखे दुख:द प्रसंग याठिकाणी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनातर्फे वारंवार शासकिय आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करून देखील त्याकडे दुर्लक्ष करणे या परिवारास चांगलेच महागात पडले आहे. तसेच विवाहास उपस्थित असलेल्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रमात तसेच अन्य ठिकाणी उपस्थित राहताना शासकीय आदेशांचे पालन करावे तसेच सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे, तोंडावर मास्क लावावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here