१ जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल, आत्ताच जाणून घ्या

0
210

मुंबई : १ जुलैपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये बँकांची खाती गोठवण्यापासून ते एटीएम शुल्क वाढवण्यापर्यंतचा समावेश आहे. १ जुलैपासून नेमके कोणते नियम बदलले जाणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात.         **बँक खाते गोठवणार                                                        बँक ऑफ बडोदाने त्यांच्या ग्राहकांना केवायसी उपलब्ध करून द्यायचा एसएमएस पाठवला आहे. ग्राहकांनी त्यांचा केवायसी बँकेला दिला नाही, तर १ जुलैपासून अशी खाती गोठवण्यात येतील. केवायसीसाठी ग्राहकांना बँकेला आधारकार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्डची माहिती द्यावी लागणार आहे.                                                          **पीएनबी बँकेच्या व्याजदरात कपात                                  देशातली दुसरी सगळ्यात मोठी बँक असलेल्या पीएनबीने त्यांच्या बचत खात्याच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून सगळ्या बचत खात्यांच्या व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. १ जुलैपासून ग्राहकांना ३.२५ टक्के एवढाच व्याजदर मिळेल.  ***एटीएममधून मिळणारी सूट संपणार                                  लॉकडाऊनदरम्यान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क लावणं थांबवलं होतं. १ जुलैपासून मात्र पुन्हा एकदा एटीएममधून पैसे काढल्यावर ग्राहकांना शुल्क भरावं लागणार आहे. केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत कोणत्याही एटीएममधून १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासाठीचं शुल्क हटवलं होतं.                             *** कमीत कमी रक्कम ठेवण्याचा नियम शिथिल                    १ जुलैपासून खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवल्यास आकारण्यात येणारी दंडाची रक्कम आकारली जाणार नाही. म्हणजेच आता ग्राहकांना बँक खात्यांमध्ये कमीत कमी रक्कम ठेवणं गरजेचं नसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here