माजी विद्यार्थी महाजन झाला उपजिल्हाधिकारी ! जामनेरच्या ललवाणी काॕलेजमध्ये गुणगौरव! सोशल डिस्टन्सिंगचे पालन!!

0
245

माजी विद्यार्थी महाजन झाला उपजिल्हाधिकारी !
जामनेरच्या ललवाणी काॕलेजमध्ये गुणगौरव!

सोशल डिस्टन्सिंगचे पालन!!

जामनेर /प्रतिनिधी

येथील इंदिराबाई ललवाणी ज्युनिअर कॉलेजातील २००६ ला १२ विज्ञान शाखेतून नाशिक बोर्डाच्या गुणवत्ता यादीत झळकलेला माजी गुणवंत विद्यार्थी प्रियेश लखुचंद महाजन याची नुकतीच उप जिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारा नियुक्ती झाली.त्याबद्दल महाजन याचा इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे वतीने दिनांक २९ रोजी सत्कार आणि गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री. दत्तात्रयभाऊ महाजन हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी माहिती आयुक्त तथा जलसंपदा विभागाचे विद्यमान सल्लागार श्री.व्ही.डी.पाटील ,माजी आमदार आणि ललवाणी शिक्षण संस्थेचे संचालक श्री.मनीषदादा जैन ,ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र महाजन ,उपाध्यक्ष श्री.विनित महाजन ,वरिष्ठ संचालक आणि माजी प्राचार्य के.व्ही.महाजन सर,संचालक फकिरा धनगर, प्राचार्य पी.आर.वाघ ,उपप्राचार्य जे.पी.पाटील , प्रा.लखुचंद महाजन ,श्री.सुरेश पाटील (पळासखेडे) ,जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिक्षक श्री.व्ही.एन.चौधरी हे उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ ,भेटवस्तू देऊन प्रमुख अतिथींचे हस्ते प्रियेश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.

सोशल डिस्टन्सचे पालन करत श्री.व्ही.डी.पाटील ,श्री.मनीषदादा जैन ,श्री.दत्तात्रय महाजन ,श्री.प्रियेश महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्तविक उपप्राचार्य जे.पी.पाटील यांनी तर प्रा.दिनेश महाजन यांनी प्रियेश महाजन याचा परिचय करून दिला.

संस्थेचे सचिव श्री.किशोरभाऊ महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक प्रा.के.एन.मराठे,पर्यवेक्षक प्रा.आर.ए.पाटील ,प्रा.के.डी.निमगडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले .तर आर.एल.शर्मा,बापू भिमडे,सुधाकर सुरळकर,निलेश पाटील ,गोपाल नाईक,हरिष साळुंखे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here