जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक ; दिवसभरात 292 नवे पॉझिटीव्ह

0
178

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा दोनशेहून अधिक येत आहे. यानंतर आज आलेल्या अहवालाने पॉझिटीव्ह रूग्णांची नोंद झाल्याचा नवा रेकॉर्ड करत 292 इतके रूग्ण आढळून आले आहेत.                                           

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होण्यास तयार नसून आज नवीन 292 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात आलेल्या अहवालानुसार सर्वाधिक 82 रुग्ण जळगाव शहरात आढळून आले असून जामनेरात 33 आणि मुक्ताईनगर तालुक्‍यात एकूण 31 रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा दोनशेहून अधिक येत आहे. यानंतर आज आलेल्या अहवालाने पॉझिटीव्ह रूग्णांची नोंद झाल्याचा नवा रेकॉर्ड करत 292 इतके रूग्ण आढळून आले आहेत. आजच्या आकड्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 302 रूग्ण झाले आहेत.

आठ जणांचा मृत्यू 
जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचा आकडा देखील वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण 96 रूग्ण बरे होवून घरी परतले असले तरी अत्यवस्थ असलेल्यांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण 309 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 79 रूग्ण हे कोरोनामुक्‍त होवून घरी गेले आहेत.

असे आढळले रूग्ण 
जळगाव शहर 82, जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 18, अमळनेर 12, भडगाव 1, पाचोरा 1, धरणगाव 4, यावल 14, एरंडोल 17, जामनेर 33, रावेर 8, पारोळा 14, बोदवड 19, चाळीसगाव 17, मुक्‍ताईनगर 31 आणि इतर जिल्ह्यातील 1 असे 292 रूग्ण आढळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here