भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या लहान भाऊ व वडीलांचा मोठ्या भावाकडून रागाच्या भरात खून; जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.येथील घटना

0
178

जामनेर;-जामनेर तालुक्यात  नांद्रा प्र. लो. या गावात हृदय पिडवटुन टाकणारी घटना घडली आहे. या गावातील निलेश आनंदा पाटील रा.नांद्रा लो. ता जामनेर यास त्याचे वडील आनंदा कडु पाटील व लहान भाऊ महेंद्र आनंदा पाटील यांनी मोठ्या भावाला समजावून सांगत होते की तु गावात का नेहमी भांडण करतो व विनाकारण वाद घालतो असे समजावण्याचा प्रयत्न करत होते.

या गोष्टीचा मोठा भाऊ निलेश आनंदा पाटील यास वाईट वाटले व रागात येऊन त्याने घरातुन चाकू आणून वडीलांना व लहान भाऊ अशा दोघांचा रात्रीच्या सुमारास पोटावर वार करून जिवे ठार मारले.

या बाबत पहुर पो स्टे ला सूनबाई अश्विनी महेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून भाग 5 गुरन 201/20 भादवि क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पहूर पोलिस यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी निलेश पाटील यास अटक करण्यात आली आहे.

घटनेचा पुढील तपास फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून पहूर पोलिस स्टेशन चे ए.पी. आय. राकेश सिंह परदेशी करत असून त्यांना पो.हे.काँ.अनिल अहिरे, पो. कॉँ.ईश्वर देशमुख, शशिकांत पाटील हे सहकारी तपासात सहकार्य करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here