जामनेर येथील काँग्रेस नेत्या सौ.ज्योत्स्ना विसपुते यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडच्या संचालक पदी सार्थ निवड; राज्यभरातुन अभिनंदनाचा वर्षाव

0
164

जामनेर;-जामनेर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या तथा प्रदेश प्रतिनिधी सौ.ज्योत्स्ना विसपुते यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि .(MAHATRANSCO)च्या संचालक (INDEPENDENT DIRECTOR) या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे . महाराष्ट्र शासना कडुन त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच ईमेलव्दारा प्राप्त झाले आहे .
ज्योत्स्ना विसपुते यांनी यापुर्वी सुद्धा आघाडी सरकाच्या कालखंडा मध्ये राज्य महिला आयोगाच्या सदस्य पदावर कार्य केले आहे .पदाला न्याय देणाऱ्या व सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देणाऱ्या अशी त्यांची ओळख आहे .त्यांच्या कार्य कर्तुत्वाची दखल महाविकास आघाडी शासनाने घेत त्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO)च्या संचालक (INDEPENDENT DIRECTOR) या पदावर नियुक्ती केली आहे . ज्योत्स्ना विसपुते यांनी या नियुक्ती बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात (प्रदेशाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) तसेच ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांचे आभार मानले आहेत.
ज्योत्स्ना विसपुते यांनी राज्य,जिल्हा व तालुक्यातून होत असलेल्या अभिनंदनांचा व शुभेच्छांचा विनम्रपणे स्वीकार करून भावना व्यक्त केल्या की, “माझा जामनेर तालुका हेच माझे कुटुंब असून मला मिळालेली जबाबदारी व सन्मान हा माझ्या तालुक्यातील जनतेचा आहे.त्यांचे आशिर्वाद माझ्या सोबत असून सदर राज्यस्तरावरील जबाबदारी मी सक्षमपणे सांभाळेल असा विश्वास व्यक्त केला आहे”. जिल्हा व तालुक्यातील महाविकास आघाडीतील मार्गदर्शक राजकीय वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांचे सुद्धा त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे .Previous article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here