या १० कारणामुळे देशी तूप खाणे महत्वाचे, जाणून घ्या या मागची कारणे!

0
329

खाईन तर तुपाशी ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. भारतीय आहारामध्ये तुपाचा वापर हा सढळ हाताने केला जातो यामागे कारण म्हणजे तुपाचे आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म होय. अगदी लहान वयापासून भारतीय घरांमध्ये तुपाचा आहारामध्ये समावेश केला जातो. अगदी निरनिराळ्या प्रकारांनी तुपाचे सेवन केले जाते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुपाचे सेवन करण्यास तरुण पिढीला सांगतात मात्र सध्याच्या युगामध्ये तुपाचे सेवन केल्यामुळे वजन वाढते हा एक गैरसमज निर्माण झाल्यामुळे तुपाचे सेवन कमी केले जाते. मात्र शुद्ध तुपामुळे शरीराला अनेक फायदे होतात व यासाठी तुपाचे सेवन नित्य नियमाने केले पाहिजे. आज आपण तुपाच्या सेवनामुळे शरीराला होणारे फायदे पाहणार आहोत.1) थंडीमध्ये आपल्या आहारामध्ये  खास करून समाविष्ट केला जाणारा पदार्थ म्हणजे तूप होय. तूपा पासून बनवले जाणारे लाडू ,गाजरचा हलवा इत्यादी पदार्थ हे आपल्या शरीरामध्ये तूप जाण्यास साहाय्य करते. शरीरामध्ये तूप गेल्यामुळे शरीरामध्ये अंतर्गत उष्णता कायम राहण्यास साहाय्य होते व त्यामुळे थंडीपासून बचाव होतो.2) चोंदलेले नाक , सर्दी या समस्या अंगदुखी, डोकेदुखी, तोंडाला चव नसणे इत्यादी समस्यांना कारण ठरतात. सर्दीमुळे अंग दुखी सोबतच ताप सुद्धा येतो. चोंदलेले नाक आणि सर्दी पासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदामध्ये तुपाचा वापर करून एक अतिशय रामबाण घरगुती उपाय सांगितला गेलेला आहे. या उपायांमध्ये सकाळी उठल्याबरोबर नाका मध्ये दोन्ही बाजूंना तुपाचे काही थेंब सोडावे. या पद्धतीला नस्य असे म्हटले जाते. नस्य करताना एका गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे ते म्हणजे  वापरले जाणारे तूप शुद्ध असणे अतिशय गरजेचे आहे.3) शुद्ध तूप हे ऊर्जेचा अतिशय मोठा स्त्रोत आहे. तुपामध्ये असलेल्या लाँरिक अँसिड घटकामुळे तुपाला अँटी मायक्रोबियल आणि अँटिफंगल हे दोन्ही तत्व प्राप्त होतात ज्यामुळे शरीरामध्ये दीर्घकाळ ऊर्जेचा साठा राहतो. तुपामध्ये असलेले फँट हे मध्यम किंवा लघु शृंखला असलेले फँट असतात यामुळे वजन वाढण्याचा धोका नसतो. तुपामध्ये असलेल्या ऊर्जेमुळे नुकत्याच बाळंत झालेल्या बाळंतीण स्त्रियांना तुपाचे लाडू खायला दिले जातात.4) शरीराचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींना नेहमीच अतिरिक्त आहारातून फँट कमी करण्यास सांगितले जाते व यासाठी सर्वप्रथम आपण तेल,तूप इत्यादींचा आपल्या आहारातील वापर कमी करतो. मात्र पूर्णपणे स्निग्ध पदार्थ आपल्या आहारातून नाहीसे झाले तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले चांगले फँट  शरीराला मिळत नाही. तुपामधून म्हणून शरीराला आवश्यक असलेले पौष्टिक पदार्थ मिळतात यासाठी जेव्हा वजन कमी करायचे असते तेव्हा बर्गर ,चिप्स यासारख्या जंक फूड मधून शरीरात जाणाऱ्या तेलावर नक्कीच नियंत्रण करावे मात्र योग्य त्या प्रमाणात तुपाचे सेवन करावे. यामुळे शरीरातील अवयवांना आवश्यक असलेले वंगण पुरवले जाऊन चयापचयाची प्रक्रियासुद्धा सुरळीतपणे चालते.5) शरीराचा एक मुख्य भाग असलेल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी तूप हे जणू काही वरदानच ठरते. त्यामध्ये असलेल्या ब्युटीरिक ॲ सि ड मुळे आतड्यांचे कार्य अगदी प्रभावीपणे चालू राहते.
6) भारतीय जेवणामध्ये रोटी किंवा चपातीवर तूप पसरून ते खाण्याची पद्धत आहे यामागे शास्त्रीय कारण हे आहे की तूप लावल्यामुळे चपाती किंवा रोटी मधील ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी होते. पिष्टमय पदार्थ पचण्यास सोपे जाते।7) तुपाचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी तूप आणि दूध यांचे मिश्रण सेवन करावे असे सांगितले जाते. रात्रीच्यावेळी झोपण्या अगोदर एक कप दुधामध्ये साधारण एक चमचा शुद्ध तूप मिसळून ते घेतले असता बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
8) हृदयविकाराच्या दृष्टीने बॅड कोलेस्टेरॉल हानिकारक असते. अन्य रिफाईंड तेलांच्या तुलनेत तुपा मधून मिळणारे फँट कमी हानिकारक असतात म्हणूनच रोज योग्य त्या प्रमाणामध्ये तुपाचे सेवन करणे हे शरीरासाठी सुरक्षित असते.9) शुद्ध तुप हे त्वचेसाठी खूप साहाय्यकारी आहे. शुद्ध तुपाच्या सेवनामुळे त्वचेला हायड्रेशन मिळते आणि तुपाचे सेवन केल्याने त्वचे्र चमक निर्माण होते.त्वचेवर तूप लावले तरीसुद्धा त्वचा मऊ आणि मुलायम होते.
10) डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा तूप खूप महत्वपूर्ण घटक मानला जातो कारण तुपामध्ये जीवनसत्व अ आणि कॅरोटेनोईड हे घटक असतात त्यामुळे डोळ्यांची दृष्टी तेजस्वी राहते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here