होम क्वारंटाइनला मान्यता;क्‍वारंटाईनचे निकष बदलले,असे आहेत सध्याचे निकष

0
246

भारतात मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. २४ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन जारी करण्यात आला. मार्च ते मे या अडीच महिन्यांत स्थिती नियंत्रणात होती. मात्र, १ जूनपासून अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला आणि देशभरातील रुग्ण वाढू लागले.

जामनेर : कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर दहा लक्षणे नसले तरीही किमान १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागायचे. डिस्चार्जआधी त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन दोनदा चाचणी व्हायची… आता रुग्णसंख्या अनियंत्रितपणे वाढत असल्याने आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे निकष बदलून दहा दिवसांतच रुग्णांना चाचणीशिवाय डिस्चार्ज दिला जात आहे.
भारतात मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. २४ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन जारी करण्यात आला. मार्च ते मे या अडीच महिन्यांत स्थिती नियंत्रणात होती. मात्र, १ जूनपासून अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला आणि देशभरातील रुग्ण वाढू लागले. महाराष्ट्रात तर संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला. जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही. जिल्ह्यात जूनपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली, जुलैत तर दररोज नव्या बाधितांचा उद्रेकच होतोय.

यंत्रणेवरील ताण वाढला
एप्रिलच्या १७ तारखेपर्यंत जळगाव जिल्ह्यात केवळ दोन रुग्ण होते. नंतर ते वाढत गेले. मेअखेरपर्यंत दीड हजार रुग्ण झाले. जून व जुलैमध्ये त्यात कमालीची वाढ होऊन आजमितीस जिल्ह्यात साडेआठ हजार रुग्ण असून, जळगाव शहराचा आकडा अडीच हजारांच्या टप्प्यात आहे. साडेचारशे रुग्णांचा बळी गेला असून, सध्या साडेतीशे रुग्ण अत्यवस्थ असल्याने आरोग्य यंत्रणेवरील तण वाढला आहे.

लक्षणांनुसार वर्गीकरण
हीच देशाची स्थिती असल्याने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने बाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे, तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेले रुग्ण असे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार रुग्णांवरील उपचाराच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

क्वारंटाइनचे निकष बदलले
सुरवातीच्या टप्प्यात रुग्ण कमी होते तेव्हा, जूनपर्यंत रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला लक्षणे नसली, सौम्य लक्षणे असली तरी किमान १४ दिवस दाखल राहावे लागत होते. हा काळ झाल्यानंतर त्याच्या स्वॅबचे दोनदा नमुने घेऊन दोन्ही वेळा निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज होत असे. मात्र, नंतर बाधित रुग्णांचा दाखल राहण्याचा काळ कमी करण्यात आला, तो आता ११ दिवसांवर आहे. रुग्णाला दहाव्या दिवशी काहीच लक्षणे नसतील तर नव्याने स्वॅब देऊन चाचणीची गरज नाही. त्याला अकराव्या दिवशीच डिस्चार्ज दिला जातो.

होम क्वारंटाइनला मान्यता
मुळात ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत, अथवा अगदीच सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी अशा रुग्णांना योग्य त्या खबरदारीसह होम क्वारंटाइन राहण्यास मान्यता देण्यात येत आहे. बाधित आणि संशयित रग्ण अथवा बाधिताच्या संपर्कातील मात्र अहवाल निगेटिव्ह आलेल्या रुग्णांचा क्वारंटाइन काळही कमी करण्यात आला आहे.

असे आहेत सध्याचे निकष
-गंभीर रुग्णावर किमान १४ दिवस उपचार
-सौम्य लक्षणे, लक्षणे नसलेल्यांना अकरा दिवसांत सुटी
-डिस्चार्ज देताना पुन्हा चाचणीची गरज नाही
-होम क्वारंटाइन होण्यास मान्यता
-क्वारंटाइन काळही १४ वरून ११ दिवसांवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here